ताज्या बातम्या

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरच्या जवानांसाठी  पोस्टाने पाठवल्या स्वनिर्मित राख्या व शुभेच्छाकार्ड. पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात. सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.

सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.
व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय
कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते व शिवसैनिक.

उद्या सावंतवाडीत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

दिनांक: २९/०६/२०२६ सावंतवाडी: शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित आणि मा.आमदार श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मंगळवार दि.३०/०६/२०२६ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता…

‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा/प्रतिनिधी दैनिक ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला…

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ २०२६’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ;

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची उपस्थिती : ९५७ बालकांना डोस देण्याचे नियोजन.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा । प्रतिनिधी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. रविवारी…

प्रशासनाचा अंदाधुंदी कारभार..

सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांचा आरोप.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: केंद्र व राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना गेली कित्तेक वर्ष प्रशासन राबवत आहे परंतु प्रशासनाच्या काही खोचक नियमावली मुळे प्रशासन लाभार्थ्यांची हेळसांड करत आहे.…

जोवेल डिसोजा यांचा अनोखा उपक्रम…

निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर प्राणी वाचवा.

प्राण्यांसाठी फळं झाडांच्या बियांची करतात जंगलात लागवड.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: या वर्षी प्रचंड उन्हाळा वाढला आणि ४६ अंशांपर्यंत पोहोचलेला पारा यांमुळे अंगाची लाही लाही होत आहे. नद्या विहिरी गोठून गेल्या आहेत.’अशी गरमी आमच्या आयुष्यात कधी पाहिली नाही,…

११ वर्षांनंतरही सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रखडले..

कोकणवासीयांत नाराजी.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आज (२७ जून) तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न गेल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर.

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा.
आद्यादेश जारी.

दिनांक: २६/०६/२०२६ मुंबई: पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
घेणार जनतेच्या गाठी भेटी..

दिनांक: २५/०६/२०२६ कणकवली:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या  निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी.

दिनांक: २५/०६/२०२६ मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी…

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा..

पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार.

मराठी भाषेचा मालवणी
भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार..

कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ.

दिनांक: २४/०६/२०२६ मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा…

You missed