वाफोली ग्रामीण मार्ग 93 00ते 900/00 मधील गवळी टेम वाडी पर्यंत ग्रामपंचायत फंडातून गटाराचे कॉंक्रिटीकरण करून द्यावे
राष्ट्रीय महामार्ग 66 च्या लागून असलेला शंकर मूर्ती ते गवळी टेंब वाडी हा भाग बांदा ग्रामपंचायत च्या हद्दीत येत असून त्या रस्त्यावरील गटाराचे काम अजून पूर्ण झालेले नाहीआणि हा रस्त्यालगत बांदा निमजगावाडी व गवळी टीम वाडी या वाडीतील अनेक घरे असून त्या घरांचा बांदा ग्रामपंचायत दप्तरी असेसमेंटला रीतसर नोंद आहे त्यामुळे या रस्त्यामधील घरांना लाईट, वीज, पाणी व इतर नागरिक सुविधा देण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासन म्हणून ग्रामपंचायतीची आहे
जवळजवळ सगळ्या वाडीतील राज्य मार्गावरील व ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यामध्ये गटारांचे काँक्रिटीकरण झाले आहे. पण बांदा शंकर मूर्ती ते बांदा गवळीटेब वाडी याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष झालेला आहे. ह्या वाडीत राहणारे ग्रामस्थ हे बांदा गावाचे मतदार नाही आहेत का? असा सवाल उ.भा.ठाचे अल्पसंख्यांक उपजिल्हाध्यक्ष रियाज खान यांनी केला आहे ह्या गटाराचे काम ग्रामपंचायत फंडातून वेळेवर न केल्यास येत्या 26 जानेवारीला शंकर मूर्ती ते गवळी टेब वाडी ह्या लगतच्या रस्त्यावर उपोषणाला बसणार आहे असा इशारा रियाज खान यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला दिला आहे