आताच शेअर करा

दिनांक: २४/०६/२०२६

मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.तर यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. मालवणी भवन उभारण्याबाबत कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेची भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो, असे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सभागृहात सांगितले.

मालवणी भाषा, संस्कृती, साहित्य आणि परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असून कोकणातील मालवणी भाषिकांसाठी ही घोषणा दिलासादायक मानली जात आहे.
मालवणी भाषा ही मराठी भाषेचाच एक अविभाज्य भाग असल्याने मालवण येथे ‘मालवणी भवन’ उभारण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा विधानसभेत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *