आताच शेअर करा

दिनांक: २७/०६/२०२६

सावंतवाडी: या  वर्षी प्रचंड उन्हाळा वाढला आणि ४६ अंशांपर्यंत पोहोचलेला पारा यांमुळे अंगाची लाही लाही होत आहे. नद्या विहिरी गोठून गेल्या आहेत.’अशी गरमी आमच्या आयुष्यात कधी पाहिली नाही, अशी प्रतिक्रिया घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून ऐकायला मिळत आहे. वाढत्या कॉक्रीटच्या इमारती, रस्ते आणि कौलारू घरांचे कमी होणारे प्रमाण यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या उष्णतेसोबतच सध्या अन्न-पाण्याच्या शोधात गवारेडे, चित्ते, माकडे यांसारखे जंगली प्राणी गावांकडे व शहरांकडे धाव घेत आहेत, ज्यातून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

या गंभीर समस्येवर सावंतवाडीतील निसर्गप्रेमी जोवेल डिसिल्वा यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग शोधून काढला आहे. वन्य जीवाची सोय करण्यासाठी वन्यजीवांना जंगलातच अन्न मिळाले, तर ते मानवी वस्त्यांकडे येणार नाहीत, या विचारातून त्यांनी जंगलात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. माणूस सद्या या गरमीने हैराण झाला आहे तर त्याचा लक्ष प्राण्याकडे आणि रानटी जनावरांकडे कसा असणार खर तर निसर्गाचा समतोल राखणे त्याची रास न होणे याच्याकडे प्रशासनाचे लक्ष असणे गरजेचे आहेत पण या तापमानामुळे जंगलात वणवे पेटू लागतात आणि  त्यात जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होत असतो. परंतु त्यातल्या त्यात राहिलेल्या प्राण्याचे तरी संरक्षण करणे मानवी जीवनाचे कर्तव्य आहे म्हणून जोवेल डिसिलवा यांनी एक पर्याय निवडला.

वर्षा पर्यटनाच्या माध्यमातून वृक्षारोपण

सध्या पावसाळा सुरू झाला असून अनेक नागरिक वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. अशा वेळी पर्यटनाला जाताना सोबत आंबा, जांभूळ, फणस, काजू यांसारख्या स्थानिक फळांच्या बिया संकलित करून त्या जंगलात पेराव्यात, असे आवाहन जोवेल डिसिल्वा यांनी केले आहे. ते स्वतः सुट्टीच्या दिवशी जंगलात जाऊन अशा विविध प्रकारच्या बिया पेरण्याचे काम सातत्याने करत आहेत. यामुळे खारुताई, वानरे, शेकरू आणि पक्षी यांना जंगलातच अन्न उपलब्ध होईल.

देवगड आणि वेंगुर्ल्यात जनजागृती

जोवेल डिसिल्वा यांनी केवळ सावंतवाडीतच नव्हे, तर देवगड आणि वेंगुर्ला येथील आपल्या कामाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन केले आहे. यासोबतच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाबाबत मोठी जनजागृती निर्माण केली आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि वन्यजीवांना हक्काचा निवारा व अन्न मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जोवेल डिसिल्वा यांच्या पावलावर पाऊल ठेवून या पावसाळ्यात जमेल तिथे बिया पेरून या चळवळीत सहभागी व्हावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *