
गोवा: पेडणे प्रतिनिधि
दिनांक: २६ जुलै २०२४
मोपा विमानतळ पी डी ए प्रकरणी स्थानिक पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार आणि स्थानिक पंचायत सरपंच उपसरपंच याना पिडिएवर सरकारने घ्यावे,टेक्सी विषय संपुष्टात आणावा ,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मांद्रे माजी सरपंच ॲड अमित सावंत यांनी दिला. तसेच मोपा विमानतळावर जो लिंक रस्ता विद्यमान सरकारने बनवला आहे. त्यावर कोणताही टोल घेतला जाऊ नये असे ही म्हणाले.
राष्ट्रीय प्रकल्पासाठी पेडणे तालुक्यातील मोप उगवे , वारखंड, कासारंर्वरणे, चांदेल हसापुर,अमेरे पोरसकडे या पाच गावातील शेतकऱ्यांनी एक करोड पेक्षा जास्त शेत जमीन ग्रीन फिल्ड मोपा एअरपोर्ट साठी सरकारला दिलेली आहे. अजून पर्यंत या गावातील भूमिपुत्रांना न्याय मिळालेला नाही. आंदोलनही वेळोवेळी केलं. सरकारने केवळ आश्वासन देण्याचं काम केलेलं आहे. योग्य तो न्याय मिळालेला नाही तो मिळवून देण्याचे काम विद्यमान सरकारने करावे.पि डी ए ला लोक विरोध का करते हे जाणून घेण्याची गरज आहे. आज एक करोड चौरस मीटर जमीन ग्रीनफिल्ड मोपा विमानतळ आणि इतर प्रकल्प उभे राहावे म्हणून सरकारने संपादन केली होती. जर पी डी ए झाली नसती तर तेथील प्रकल्पामुळे पंचायतीला येणारा कर भेटला असता आणि तेथील पंचायती आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाल्या असत्या. पि डी ए वर विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री चेअरमन या पदी असून त्यांनी पंचायतीतील लोकप्रतिनिधींना तिथे का स्थान दिले नाही? असाही सवाल अमित सावंत यांनी उभा केला. सरकारने पेडणेवासीयांची दिशाभूल केलेली आहे. ही त्वरित थांबवावी न पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सावत यांनी दिला. आमदार प्रवीण आरलेकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ज्या पाच संबंधित पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांना पी डी ए मध्ये समाविष्ट करून घ्यावे असे पेडणेवासीयांच्या वतीने अधिवेशनात आपले म्हणणे मांडले त्याबद्दल अमित सावत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
