आताच शेअर करा

दिनांक:०९/११/२०२६

बांदा प्रतिनिधी :-
      पिंपळेश्वर मित्र मंडळ देऊळवाडी आयोजित खुल्या गटात श्री. देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा मंडळाला प्रथम क्रमांक रोख रुपये २५५५५ तर युथ सर्कल भिवंडा पेडणे गोवा यांना रोख रुपये १५५५५ द्वितीय क्रमांक मिळाला. बांदा मर्यादित स्पर्धेत श्री.देव बनंखनकर संस्थान कला, क्रीडा मंडळ  काळसेवाडी, सुतारवाडी बांदा यांना प्रथम क्रमांक , बांदेश्वर युवा मंडळ यांना द्वितीय तर पाटेश्वर युवा मंडळ आळवाडा बांदा तृतीय क्रमांक मिळाला.
     पिंपळेश्वर मित्र मंडळ देऊळवाडी बांदा आयोजित भव्य नरकासुर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रमोद कामत त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेताताई कोरगावकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, जावेद खतिब, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, उद्योजक आप्पा चिंदरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर,दिपक सावंत,जेष्ठ मार्गदर्शक गोकुळदास साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष आकाश सावंत, अक्षय परब, समीर कल्याणकर,सुनील माजगावकर, लवू परब आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
     भव्य नरकासुर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मंडळाच्या सामाजिक व विधायक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी बोलताना प्रमोद कामत म्हणाले, “गेली सलग आठ वर्षे पिंपळेश्वर मित्र मंडळाकडून ही नरकासुर स्पर्धा अविरतपणे आयोजित केली जात आहे. मंडळाच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने विविध मंडळे आणि युवक एकत्र येतात. त्यामुळे समाजातील एकोपा व बंधुभाव टिकून राहण्यास निश्चितच मदत होते.” ते पुढे म्हणाले, “पिंपळेश्वर मित्र मंडळाकडून भविष्यातही अशाच प्रकारची विधायक आणि सामाजिक कामे सातत्याने घडत राहावीत. मंडळाच्या अशा विधायक उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील. तसेच या भव्य नरकासुर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणांहून आलेल्या सर्व मंडळांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
प्रमोद कामत यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना युवकांनी सामाजिक एकोपा आणि विधायक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहनही केले.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, भाजप महीला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेच्या निमित्ताने लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता त्याची बक्षीसे
प्रथम पारितोषिक तेजस मेस्त्री. निरवडे वाशिंग मशीन,
द्वितीय पारितोषिक किरण कदम फ्रिज डींगणे,
तृतीय पारितोषिक अमित पिळणकर मोरगाव कुलर व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण देवेश मुळीक, गौरांग साळगावकर, साहील परब, आशिष सावंत यांनी केले.यावळी खास आकर्षण ठरले ते प्रशांत सावंत यांचा साईबाबा च्या भुमिकेतला स्टॅच्चू सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आकाश सावंत, उपाध्यक्ष गौरव सावंत, सचिव रोहन सुपल, खजिनदार आशिष सावंत मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन सावळाराम शिरोडकर व राकेश परब यांनी केले तर आभार शेवटी राकेश परब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *