आताच शेअर करा

दिनांक: ०७/१०/२०२६

सावंतवाडी:महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश शंकर राऊळ, युवराज लखमराजे भोसले, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती श्री सचिन देसाई, नगरसेवक श्री बाबू कुडतरकर, तुषार साळगावकर भूषण सारंग, शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार शिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर साहेब यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री दादाजी भुसे यांच्या सावंतवाडी आगमनावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *