गोवा : पेडणे प्रतिनिधि
दिनांक : २५ जुलै २०२४
विठ्ठलदास मोरजी पेडणे येथे मच्छीमार बांधवांच्या दोन होड्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने अलेक्स फर्नांडिस याचे सुमारे अकरा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. हे कृत्य करण्याचे धाडस जमीन माफियाचा यामध्ये हात असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे. विठ्ठलदास मोरजी हे समुद्र किनाऱ्यावर असून येथील लोकांचा मच्छीमार हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे समुद्राच्या काठावर आपल्या होड्या ठेवणे तसेच जाळे आणि मच्छीमार उपयोगी वस्तूंची एका साध्या झोपडीत त्यांची तरतूद करून त्या जागेमध्ये ठेवण्यात येते. पण ह्या जागे जागेवर कोणी अज्ञात व्यक्तीने येऊन आग लावली आहे. त्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या होड्या ,जाळे आणि मासेमारीसाठी लागणाऱ्या वस्तू हे जळून खाक झाले आहे. ही आग विझवण्यासाठी जवळ पासच्या स्थानिक लोकांनी येऊन सहकार्य केले व आग विझवण्यात आली. बऱ्याच वेळानंतर फायर ब्रिगेड चा बंब आला पण त्यावेळी पूर्ण आग विझवली होती. समाजसेवक संजय कोले यांनी सांगितले की येथील आग ही काही माफीयांनी समुद्रकिनाऱ्या जवळ जमीन विकत घेतलीआहे. त्यांच्या जमिनीपासून समुद्र किनाऱ्यावरील दर्शन घेण्यास हया मच्छिमारांच्या झोपड्याचा अडथळा निर्माण होत असल्यास कारणांमुळे हे जाणूनबुजून कृत्य अज्ञात व्यक्तीने केलें आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरचा माफियांच्या दृष्टिकोनातून पूर्ण दर्शन घडत नसल्या कारणामुळे हे कृत्य केले असा माझा आरोप आहे.त्यानंतर ते म्हणाले की अग्निबंब येण्यासाठी बराच उशीर लागल्याने ही आग लवकर विझवता आली नाही. त्यामुळे बरेचसे नुकसान झाले आहे. मोरजी येथे अग्निशामक दलाचे एक अग्निबंब असावा अशी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. येथील रस्त्याची दहनीय अवस्था होऊन चाळण झाल्या कारणामुळे रहदारीसाठी अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकडेही मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित विभागाचे लक्ष वेधले पाहिजे. ते पुढे म्हणाले की येथील मच्छीमार बांधव हा कायमस्वरूपी स्थित येथे वास्तव्य करत आहे.त्याच्यावर असा जमीन माफियाने अत्याचार करण्याचा प्रयत्न करू नये न पेक्षा पुढील कालावधीत असे जर अत्याचार झाले तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. असा इशारा देण्यात आला. या जमीन माफीया यामुळे आज झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण? असाही प्रश्न केला त्यामुळे विद्यमान सरकारने पुढे येऊन झालेल्या संपूर्ण प्रकाराची पडताळणी करून योग्य तो मोबदला देण्याचे यावा.