आताच शेअर करा

दिनांक:१०/११/२०२६

बांदा:घारपी येथील केरळ मधील इसमाने घेतलेल्या जमिनीमध्ये काम करत असलेल्या जनमधिर ओराव नामक नोकरास सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.प्राथमिक स्वरूपात चक्कर आल्याने मालकाने चौकशी केल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. आज सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या चहाच्या बागेत काम करत असताना अचानक बोटाला इजा झाल्याचे  कामगराच्या निदर्शनास आले.कामगाराने लगेच मालकाशी संपर्क साधला.प्रथम दर्शनी सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच बांदा रुग्णालयात कामगाराला दाखल करण्यात आले. उपचार योग्यवेळी झाल्यामुळे कामगाराचे प्राण वाचले.डॉ.सारंग यांनी आता प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *