
दिनांक:१०/११/२०२६
बांदा:विलवडे गावातील प्रसिद्ध दशावतार तबला वादक महादेव उर्फ बाबी भिकाजी दळवी (64) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेली 45 वर्षे ते नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळात तबलावादक म्हणून कार्यरत होते. दशावतार संगीत साथमध्ये ते गायनही करत असत. पारंपरिक दशावतारात सुप्रसिद्ध तबला वादक म्हणून वेगळी कलाकृतीच्या माध्यमातून ओळख निर्माण केली होती नाटकातील दुःखी प्रवेशात ते आपल्या मुखावाटे संगीत देत असत. लहान चिलाया बालकाचा रडण्याचा हुबेहुब आवाज काढत असत.आपल्या दशावतार कलाकृतींमध्ये कित्तेक रंगमंच गाजवले. दशावतार तबलावादक तसेच शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांनाच परिचित होते. मंगळवारी सकाळी 9.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विलवडे माऊली देवस्थानचे मानकरी राकेश आणि विष्णू दळवी यांचे ते वडील होत तर माणगाव येथील यक्षिणी दशावतार मंडळाचे हार्मोनियम श्री प्रभाकर दळवी यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय पुतणे असा परिवार आहे..
