
दिनांक: ३ मे २०२५
पेडणे (निवृत्ती शिरोडकर )
मांद्रे मतदार संघासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण शंभर कोटी रुपये मंजूर करून जमीनही कला आणि संस्कृती खात्याच्या ताब्यात दिली. शिवाय बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्पही मांद्रे पंचायत क्षेत्रात उभारला जाणार असून त्यासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर झाले आहे. आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत मांद्रे मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या वेळी आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करतो. त्यांची भेट घेतो. त्यावेळी ते प्राधान्य क्रमाने मांद्रे मतदार संघातील विकासाला प्रोत्साहन देत असल्याची माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
दोनशे कोटी रस्त्यांना मिळणार
मांद्रे मतदार संघातील जे रस्ते हॉट मिक्स डांबरीकरण रुंदीकरण झाले नव्हते .त्या रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम खाते तथा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रोत्साहन देताना हॉट मिक्स डांबरीकरणासाठी मंजुरी दिलेली आहे. शिवाय चोपडे ते हरमल पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यासाठी १०० कोटी रुपये तर हरमल ते पालये केरी या रस्त्यासाठी १०० कोटी मिळून २०० कोटी रुपये मंजुरी मिळणार असल्यास चा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त करून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्याबरोबरच दोन्ही रस्त्यांच्या बाजूला सुशोभीकरण केलं जाईल. अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी देऊन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची मांद्रे मतदार संघासाठी दूरदृष्टी असल्यामुळे ते कसल्याच विकास कामांना विलंब लावत नाही. ज्या ज्या वेळी आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे विकास कामे घेऊन जातो. त्यावेळी ते लगेच मंजुरी देतात अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
प्रत्येक गावात मासळी
आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे माद्रे मतदार संघाच्या विकासासाठी भुकेलेले आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी आपण विकास कामे घेऊन त्यांच्याकडे जातो. त्यावेळी ते कामाला प्राधान्य देतात अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघातील गावागावांमध्ये सुसज्ज मासळी मार्केट उभारले जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या दीड वर्षांमध्ये मांद्र मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी १००% मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सहकार्य मिळत असल्यामुळे या विकासाला गती मिळणार असल्याचे आमदार जीत आरोलकर म्हणाले.
आमदार जीत आरोळकर म्हणाले की येणाऱ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात मांद्रे मतदार संघाच्या विकासातून कायापालट होणार आहे. त्यासाठी सरकारकडून १००% सहकार्य मिळत आहे. वीज पाणी रस्ते याबरोबरच वेगवेगळे नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बेरोजगारीच्या प्रश्न सोडवण्यासाठी तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटीला प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय तुये हॉस्पिटल सुरू केल्यानंतर याही हॉस्पिटलमध्ये स्थानिकांना सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील . शिवाय रवींद्र भवन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इतर प्रकल्प येणार त्यातून नोकऱ्यांना चांगली संधी मिळणार असा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.
