आताच शेअर करा

दिनांक: ०१/०७/२०२६

पणजी (गोवा):
“कथालेखक जगदीश कदम यांच्या ‘महामार्ग’ या कथासंग्रहातून शेतकरी, कष्टकरी आणि समाजव्यवस्थेने पिचलेल्या सामान्य माणसाचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.आशय आणि भाषेच्या दृष्टीने ही कथा आपले वेगळेपण सिद्ध करते.’असे प्रतिपादन ज्येष्ठ गोमंतकीय कवी आणि लेखक दशरथ परब यांनी केले.
पणजी येथील ‘इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा’ सभागृहात आयोजित जगदीश कदम यांच्या ‘महामार्ग’ या कथासंग्रहाच्या दिमाखदार प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी आणि समीक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले ‘जगदीश कदम यांची कथा समकालीन प्रश्न मोठ्या ताकदीने मांडते.  शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या पिढी नंतरची ही महत्त्वाची कथा आहे,असे सांगून कथेवर सविस्तर भाष्य केले.
कथासंग्रहाच्या या दिमाखदार  प्रकाशन सोहळ्यात उपस्थित साहित्यिकांनी पुस्तकाविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले
कथालेखक जगदीश कदम यांनी मनोगतात आपली कथा मोडलेल्या माणसाच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करते.त्यामध्ये ती किती यशस्वी झाली आहे.ते वाचकांनी ठरवावे.असे उद्गार काढले.
डॉ. अनिल काळबांडे (समीक्षक): यांनी कथेतील ताणेबाणे आणि सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर प्रकाश टाकला.
श्रीनिवास मस्के (रानकवी): यांनी ग्रामीण जीवन आणि कथांमधील जिवंतपणा यावर भाष्य केले.
अध्यक्षीय भाषणात कवी दशरथ परब यांनी लेखकाचे कौतुक करताना सांगितले की, “जगदीश कदम यांची कथा आशय आणि भाषा या दोन्ही दृष्टीने समृद्ध असून, समकालीन मराठी कथाविश्वात आपले एक वेगळे आणि ठसठशीत अस्तित्व निर्माण करणारी आहे.’असे आवर्जून नोंदवले.
हा ग्रंथ प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी बंडू झळके आणि सतीश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी कवी संतोष चिले यांनी उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed