
केरी पेडणे येथे डॉ अनंत नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करताना न्यू इंग्लिश हायस्कुलचे व्यवस्थापन मंडळ , पालक शिक्षक संघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
दिनांक: १ मे २०२५
(गोवा) हरमल:केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ अनंत नाईक यांना शाळेतर्फे केरी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्रजेश केरकर, उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर, खजिनदार मिलिंद तळकर, व्यवस्थापक शैलेंद्र कुबल, सहसचिव दत्ताराम नाईक, कार्यकारी सभासद सूरज तळकर, बाबुसो तळकर, राजन सावळ, देवेंद्र गाड, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमृत पेडणेकर, उपाध्यक्षा संजना तळकर, सुप्रिया केरकर, माजी मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.
याप्रसंगी व्रजेश केरकर म्हणाले कि, डॉ नाईक हे केरी गावचे सुपुत्र असून केरी शिक्षण संस्थेचे ते संस्थापकीय अध्यक्ष होते. शाळेच्या स्थापनेपासुन शाळेच्या विकासात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. डॉ नाईक यांच्या जाण्याने केरी गावातील सहृदय आणि संवेदनशील व्यक्तीला आम्ही मुकलो. तसेच त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे याबद्दल केरकर यांनी दुःख व्यक्त केले.
कार्यक्रमाचे निवेदन वैशाली न्हानजी यांनी केले.