आताच शेअर करा

दिनांक:१३/११/२०२६

बांदा :दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारून इतिहास आणि शिवकालीन संस्कृतीची आठवण जागविली. माती, दगड, कागद, लाकूड व उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी ही किल्ल्याची प्रतिकृती साकारली.
  चिमुकल्या हातांनी उभारलेल्या या किल्ल्यात बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार आणि किल्ल्याची वैशिष्ट्ये साकारण्यात आली. किल्ले केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, स्वराज्याच्या संकल्पनेचे आणि आपल्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून करून देण्यात आली.
  किल्ला उभारताना विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे काम करत नियोजन, सर्जनशीलता, संघभावना, श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण यांचा अनुभव घेतला. पुस्तकातील इतिहास प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
  दुर्गम भागातील चिमुकल्या हातांनी उभारलेला हा किल्ला केवळ मातीचा नव्हता; तर तो त्यांच्या मनातील इतिहासप्रेम, शिवरायांप्रती आदर आणि स्वराज्याच्या विचारांचा सुंदर आविष्कार होता.
   या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed