आताच शेअर करा
पुरुष विभागात  प्रथम- भूमिका स्पोर्ट्स क्लब कोरगांव,

दिनांक :३० डिसेंबर २०२५

पेडणे: श्री. कमळेश्वर हायस्कूल कोरगाव पेडणे येथे दि २४/१२/२०२५ रोजी सपन्न झाली.
ही स्पर्धा १७ वर्षा  खालील
मुलगे, मुली, १९ वर्षा खालील मुलगे, मुली, व वरिष्ठ मुलगे व मुली या तिन्ही गटात खेळवल्या गेल्यात.
या स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, विशेष अतिथी नवनियुक्त जिल्हा पंचयात सदस्य  राधिका पालयेकर, कोरगाव, कोरगाव सरपंच देविदास नागवेकर, उपसरपंच दिवकर जाधव,
अब्दुल नाईक पंचसदस्य, जुही थळी प्रिन्सिपल कमळेश्वर हा.से. कोरगांव, सुदन बर्वे सेक्रेटरी, कृष्णा गावडे सेक्रेटरी श्री. कमलेश्वर देवस्थान, उदय पालयेकर मा. सरपंच, उज्ज्वला तिळवे मा. उपसरपंच पालये, देवानंद गावडे सेक्रेटरी  भाजपा पेडणे, किरण सावंत अध्यक्ष शूटिंगबॉल असोसिएशन ऑफ गोवा  सचिव ऍड जगदीश तोरस्कर,  उपाध्यक्ष जितेंद्र तिळवे, खजिनदार मनीषा परब, संतोष शेटगांवकर सहसचिव, नितीन नाईक सहसचिव, साईश आरोलकर सदस्य उपस्थित होते.
जितेंद्र तिळवे यांनी प्रस्थाविक करताना असोसिएशनचा आजवर चा प्रवासाचा आलेख कसा वाढत गेला. हे सांगताना भारतीय संघात खेळलेल्या अनेक खेळाडूंना सरकारच्या विविध खात्यात खेळाडू कोट्यातून नोकरी मिळाल्याचे सांगत ही संधी सोडू नका असे आवाहन केले. 
आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की
खेळामुळे शरीरिक विकासाबरोबर मानसिक आणी बौद्धिक विकास होतो.म्हणून खेळ हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असावा. असे आवाहन केले. व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. इतर मान्यवरांची  समयोचित भाषणे झाली. व  सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या  वेळी नवनिर्वाचित झेड पी म्हणून राधिका पालयेकर यांचा व  सुनील गावडे यांचाआंतरराष्ट्रीय पंच म्हणून असोसिएशन च्या वतीने आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामने संपल्यानंतर बक्षीस वितरण प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित झेड. पी. सदस्या तारा हडफडकर, ऍड. अमित सावंत उपाध्यक्ष शु. असो. ऑफ गोवा सोबत असो. चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. असो. सेक्रेटरी  ऍड. जगदीश तोरस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगिताने सांगता झाली.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
पुरुष विभागात  प्रथम- भूमिका स्पोर्ट्स क्लब कोरगांव, द्वितीय- सनराइज् स्पोर्ट्स क्लब मेनकुरे, तृतीय- कीर्ती विद्यालय शिवोली,
बेस्ट शूटर- लक्ष्मण  शेट्ये
बेस्ट डिफेंडर – कृष्णा नाईक,

महिला विभाग-
प्रथम- टायगर स्पोर्ट्स पत्रादेवी
द्वितीय- भूमिका स्पोर्ट्स अँड युथ क्लब आश्वेम मांद्रे
तृतीय- सनराइज् स्पोर्ट्स क्लब मेणकुरे,
बेस्ट शूटर- लुईझा फ‌र्नाडीस
बेस्ट डिफेंडर – त्रिवेणी सावंत

ज्यू. मुले. (१९वर्षा खाली)
प्रथम- पालये स्पोर्ट्स क्लब पालये
द्वितीय- श्री कमळेश्वर हायर सेकण्डरी स्कुल कोरगाव
तृतीय- सनराइज् स्पोर्ट्स क्लब मेणकुरे,
बेस्ट शूटर- देवेश तिळवे
बेस्ट डिफेंडर- ओमकर गावडे

ज्यू. मुली . (१९वर्षा खाली)
प्रथम – सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय पेडणे
द्वितीय- श्री. कमळेश्वर उच्च माध्यमिक स्कुल कोरगाव
बेस्ट शूटर- नियती मठकर
बेस्ट डिफेंडर- वैभवी गावडे
सब जुनिअर मुले (१७वर्षा खाली)
प्रथम- सरकारी हायस्कुल तोरसे
द्वितीय- शिवाजी राजे हायस्कुल
तृतीय- हलर्ण पंचक्रोशी हाय स्कुल हलर्ण
बेस्ट शूटर- जिग्नेश तारी
बेस्ट डिफेंडर- मोरेश्वर नाईक.

सब जुनिअर मुली  (१७वर्षा खाली)
प्रथम- आर. डी. खलप मांद्रे
द्वितीय- सरकारी हायस्कुल तोरसे
तृतीय- दुर्गा हाईस्कुल पार्से
बेस्ट शूटर- श्रेया पार्सेकर
बेस्ट डिफेंडर- प्रांजल परब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed