आताच शेअर करा

दिनांक:१५/११/२०२६

मळगाव : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची सभा काल मंगळवारी शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आगामी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा यशस्वीरीत्या आयोजित करण्याच्या दृष्टीने सभेत सविस्तर चर्चा करून मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली.
या सभेला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नार्वेकर, उपाध्यक्ष मनीषा नाटेकर-राऊळ, कोषाध्यक्ष गावकर, शाळेचे मुख्याध्यापक दत्तगुरू कांबळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना तेली, शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर आदी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मुख्याध्यापक दत्तगुरू कांबळी यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर आगामी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे स्वरूप, आयोजनाची रूपरेषा, आवश्यक पूर्वतयारी आणि नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मेळाव्याचे नियोजन सुरळीत व यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार स्वागत समिती, अल्पोपहार समिती, प्रसिद्धी समिती, निधी संकलन समिती, कार्यक्रम व नियोजन समिती, मंडप व सजावट समिती, बैठक व्यवस्था समिती, सूत्रसंचालन समिती आणि पार्किंग व्यवस्था समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed