आताच शेअर करा

दिनांक:१३/११/२०२६

आरोस (ता. सावंतवाडी) :येथील गिरोबावाडीमधील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु. भाविका उमेश नाईक हिने दिवाळीनिमित्त शिवनेरी किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. मातीचा वापर करून तिने किल्ल्याची तटबंदी, पायऱ्या आणि विविध ऐतिहासिक रचना अत्यंत कल्पकतेने उभारल्या आहेत.

या किल्ल्याच्या सजावटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती, मावळे, हत्ती, घोडा, बकरी, तोफा, तोफगोळे तसेच भगव्या ध्वजाचा वापर करण्यात आला आहे. या सजावटीमुळे किल्ल्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले असून शिवकालीन वातावरणाची अनुभूती मिळत आहे.

दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याच्या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न भाविकाने केला आहे.

लहान वयातच ऐतिहासिक वारशाची आवड जोपासत मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर साकारलेल्या या शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीचे परिसरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *