आताच शेअर करा
फोटो:नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स चे विद्यार्थी सोबत शिक्षिका वैष्णवी जोशी व देवस्थान पदाधिकारी (छाया निवृत्ती शिरोडकर )

दिनांक: २१ एप्रिल २०२५

पेडणे (प्रतिनिधी )
वरचा वाडा मोरर्जी येथील नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी आणि नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी मोरर्जी फडते कुल येथील श्री सातेरी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त भक्तिरंग नृत्याचा अविष्कार सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मनी जिंकली.
नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स शेकडो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक दुर्गा उत्सव देवतांच्या वर्धापन दिनानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी दर्जेदार नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांचे उपस्थितांची मनी जिंकण्या बरोबरच वेगवेगळी नृत्याविष्कार सादर करून अल्पकाळात भरारी घेतलेली आहे.
नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम कलेमध्ये शेकडो विद्यार्थी घडवण्याचं काम वैष्णवी जोशी यांनी केले. मोरजी पेडणे शिवोली म्हापसा  या ठिकाणी नृत्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत .त्यातील काही मोजक्याच नृत्य बालकलाकारांनी 20 रोजी श्री सातेरी देवीच्या वर्धापन दिनानिमित्ताने खास भक्तिरंग कार्यक्रम सादर केला.


मानसी शिरोडकर,आरल मोरजे,आशी मोरजे,निर्वि पडते
आद्या फडते,साची राऊत,साची हरमलकर,आर्वी शेटगावकर,करिष्मा शेटगावकर,निशा शिरोडकर
अदिती कोरगावकर
नेहा कोरगावकर,दिव्या ढोणे,सृष्टी सावंत,सृष्टी आश्वेकर
वरदा शेटगावकर,प्रियल पवार,,आराध्या दाभोलकर
श्रीया तेमकर,हर्षाली  हलनकर,मानवी शेटगावकर
मनस्वी शेटगावकर,ऐशवर्या वडार,आर्या बांदेकर
शैवी लाड,Saichha चोडणकर,लक्षिका चोडणकर
नंदिशा गावकर,स्मृती सळगावकर
गरिमा साळगावकर,आदी कलाकारांनी नृत्य सादर केले. त्यात
गणेश वंदना चामुंडा स्तुती कोळी नृत्य गणेश कौतुकम शारदा स्तुती, शिव स्तुती, देवी स्तुती, सातेरी वंदना,नांदी, वराह रुपम ,सूर निरागस हो, त्रिदेवी स्तोत्र.सादर केले.
सुरुवातीला प्रास्ताविक स्वागत आणि सूत्रसंचालन श्रेया महेश फडते यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *