
पेडणे /प्रतिनिधि
दिनांक: २१ एप्रिल २०२५
गावागावातील जी प्रमुख मंदिरे आहेत. त्या मंदिरामध्ये धार्मिक उत्सवाबरोबरच आपली संस्कृती आपली परंपरा आणि सर्व समाजाला एकत्रित आणून एकोपा तयार करण्याबरोबरच गावचा विकास करण्यास हातभार लावत असल्याचे उद्गार राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काढले.
इब्रामपूर येथील श्रीदेवी सातेरी मंदिराच्या वाढदिवसानिमित्ताने शानदार उत्सव धार्मिक उत्सवाचे आयोजन केले होते. श्री सातेरी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी खासदार सदानंद शेट तानावडे चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री देवी सातेरी देवस्थानचे अध्यक्ष सत्यम गावस पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सदानंद शेट तानावडे यांनी बोलताना भारतीय संस्कृतीचे दर्शन प्रत्येक गावागावातील प्रमुख मंदिराच्या उत्सवातून दिसून येते. एखाद्या मंदिराचा उत्सव असला की गावातील सर्व समाजातील भक्तगण एकोप्याने नांदत असल्याचे चित्र दिसत येते. उत्सव साजरा करत असताना आपली परंपरा संस्कृतीचा संवर्धन करण्यासाठी धार्मिक उत्सवात सहभाग घेत असताना आपसातील मतभेद विसरण्यात कार्य करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते. मंदिर ही समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच संस्कृतीचे दर्शन उत्सवातून होत असते .असेच उत्सव अनंत काळापासून सुरूच ठेवावे. असे आवाहन यावेळी खासदार शेट तानावडे यांनी केले.
यावेळी हसापूर चांदेल सरपंच तुळशीदास गावस यांनीही मंदिरातून होणाऱ्या उत्सवाला एक परंपरा आहे. एक धार्मिक उत्सव तयार करत असताना आयोजक देवस्थान समिती ज्या पद्धतीने कार्य करत आहे. तेच कार्य याही पुढे चालू ठेवून परंपरा संस्कृती टिकवण्याचं कार्य अविरत चालू ठेवावे असे ते म्हणाले.