सिंधुदूर्ग संपादकीय
दिनांक: ८ ऑक्टोंबर २०२४
जोदशावतारी नाटकात याआधी असं घडलं नसेल असा आगळा-वेगळा प्रकार सावंतवाडी तालुक्यांतील निगुडे गाव येथे घडला आहे. दशावतार देखील समाज प्रबोधनाचे काम करु शकते ही पोच पावती आज या कलेतून उमलताना दिसत आहे. ह्या कलेतून शिक्षणाचे धडे गिरवता येतात यांचे ज्वलंत आणि जागृत उदाहरण आपल्याला खालील व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल. घडले काय
…निगुडे येथे कै.बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा “अनंत चथुर्दशी महिमा” हा नाट्यप्रयोग सुरू होता… तेव्हा दशावतारी स्त्री कलाकार श्री.यश जळवी’ हे आपल्या भूमिकेत ‘तू बुद्धी दे’ हे भावगीत म्हणत असताना अक्षरशः प्रेक्षक वर्गातील सर्व लहान मुलांनी आणि इतर प्रेक्षक मंडळींनी हे भावगीत त्यांच्या बरोबर म्हणायला सुरवात केली सगळा प्रेक्षक वर्ग या नाटय प्रयोगाच्या प्रार्थनेत एवढा दंग झाला कि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं.. पहिल्यांदा मंदीरात नाटय प्रयोगाच्या वेळी शाळेतली भक्तीगीत मंदिराच्या सभा मंडपात नाट्य संगीताच्या तालावर आणि कलाकाराच्या गायनाच्या जोरावर कलाकारा सोबत मुले आणि प्रेक्षक गुणगुणताना निदर्शनास आली.खरोखरचं हेच या सादर केलेल्या कलेचं खरं बक्षीस म्हणावं लागेल.

संपर्क:8369539769/9819957223