
बांदा प्रतिनिधी संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ११ ऑक्टोंबर २०२४
सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ व गुरुनाथ पेडणेकर (माजी शिक्षण व आरोग्य सभापती) आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
माध्यमिक विद्यालय डेगवे हायस्कूलची कु समृद्धी जयराम देसाई हीने लहान गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ‘ पर्यावरण संतुलन ‘ या विषयावर तिने उत्कृष्ट वक्तृत्व सादर केले
कुमारी समृद्धी हिचे तिच्या यशाबद्दल तसेच तिच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीम. यशदा देसाई मॅडम यांचे संस्थेच्या अध्यक्षा – श्रीम. कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष- डॉ मिलिंद तोरसकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व पालकवर्गाकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
