न्हावेली प्रतिनिधि

दिनांक:८ ऑक्टोंबर २०२४
मातोंड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
न्हावेली / वार्ताहर
श्री देव खरोबा मित्रमंडळ, मातोंड नाटेलीवाडी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आणि एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या माध्यमातून आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिराला तब्बल १०३ रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन मातोंड ग्रामपंचायत सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच आनंद परब माजी पंचायत समिती उपसभापती प्रफुल्लचंद्र परब ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब विशाल बागायतकर वैभवी परब सामाजिक कार्यकर्ते तुकाराम परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरासाठी लाईफटाईम हॅास्पिटलचे डॅा.प्रकाश घोगळे,डॅा.योगेश केंद्रे,डॅा.अभिजीत खाके,डॅा.नीलेश मेत्रे,गोविंद परब,यांचे विशेष सहकार्य लाभले.या शिबिरात नेत्र तपासणी ह्रदय तपासणी,रक्त ब्लड प्रेशर,शुगर तपासणी,तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या.यावेळी लाईफ टाईम हॅास्पिटलचे पूर्वा धुरी,सरफराज नाईक,ज्योती चव्हाण,रितेश घाडीगांवकर,राकेश पुजारे,विकास लुडबे,यांचे सहकार्य लाभले.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री देव खरोबा मित्रमंडळांचे कार्यकर्ते सत्यवान वैद्य,मंगेश जबडे,प्रसाद जबडे,जयराम केणी,आनंद जबडे,गुरुनाथ नाईक,परशुराम नाईक,नंदकिशोर जबडे,विजय कोरगावकर,सुनिल जबडे,प्रथमेश नाईक,अंकुश नाईक,सचिन नाईक,संदेश कोरगावकर,कृष्णा नाईक,अरुण मयेकर,विशाल बागायतकर,प्रशांत जबडे,दत्ताराम परब,पूजा वाडयेकर,सुविधा वाडयेकर,ओमकार कोरगावकर,नारायण केणी,साहिल नाईक,प्रसाद नाईक,यांनी मेहनत घेतली.