आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर

दिनांक:१ ऑक्टोंबर २०२४



बांदा:- येथील पानवळ येथे असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात झाडे-झुडपे वाढल्याने मंदिरात जाण्या-येणाऱ्या भाविकांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. तसेच आजूबाजूचा परिसर हा जंगलमय असल्याने साप व इतर जंगली प्राण्यांचा देखील धोका वाढलेला होता. ही बाब लक्षात येताच पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत सदर मंदिर व परिसराची साफसफाई करण्याची मोहीम आखली व आज श्रमदानाने सर्व मंदिर परिसरातील झाडेझुडपे हटवत परिसर मोकळा केला. त्यामुळे स्थानिक तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले व यावेळी सदर युवकांचे कौतुक देखील केले.
या श्रमदानाच्या कार्यात पानवळ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या स्वयम वळंजू , ऋग्वेद कल्याणकर, जतीन देसाई ,अमोल सावंत,नारायण सावंत,ओंकार गवस यांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *