
(गोवा): हरमल प्रतिनिधि
दिनांक : १४ ऑगस्ट २०२४
लोकमान्य टिळकानी केलेले कार्याची नव्या पिढीला जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी केली जाते. अन्याया विरुद्ध चीड, स्वराज्याचा ध्यास, देशप्रेम, स्वदेशीचा आत्मसान्मान हे गूण नव्या पिढीने अंगीकरावे हीच लोकमान्यांना आदरांजली ठरणार असे प्रतिपादन शिक्षिका मिताली हरमालकर यांनी केरी पेडणे येथे केले.
न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात शाळेच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या टिळक पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मिताली हरमालकर प्रमुख वक्त्या या नात्याने बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, सलोनी हर्जी, रेश्मा परब, पालक शिक्षक संघ अध्यक्ष प्रज्योती वस्त, प्राज्वल झालबा, विद्यार्थी मंडळाच्या शिक्षण मंत्री रूची आपा परब उपस्थित होते.
सुरुवातीला न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर सर लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी लावण्येश नामदेव राऊत, विशांत विनायक केरकर यांची भाषण केले. यशस्वी रत्नाकर सावळ हिने प्रतिज्ञा दिली. प्राथमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनीही याप्रसंगी मार्गदशन केले.
लोकमान्य टीळक पुण्यतिथी निमित्त पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या मुलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्या मुलांची नावे, शिशूवाटीकेत अ गट
नॅचलन डिसोजा, विदयांश तळकर, ब गट रूही आपा परब, आरुष आनंद सोसे,इयत्ता पहिली आारवी संदीप आरेकर, साईश रत्नाकर सावळ, इयत्ता दुसरीत शनाया अमित वस्त, इयत्ता तिसरीत रूची आपा परब, सार्थक श्यामसुंदर केरकर, इयत्ता चौथीत
आरोही आनंद सोसे, प्रजोत प्रदीप झालबा
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सोनाली वस्त यांनी केले. तर आभार प्रदर्शन मनीषा वेंगुर्लेकर यांनी मानले.
💐जाहिरात 💐
