आताच शेअर करा

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि

दिनांक: १० ऑगस्ट २०२४
निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी मतदारांना वेगवेगळी आश्वासने देतात. दिलेली आश्वासने सर्वच उमेदवार पाळतात, असे नाही. परंतु सावंतवाडा-मांद्रे येथील माजी सरपंच तथा पंच अॅड. अमित सावंत यांनी पंचायत निवडणुकीवेळी प्रभागामधील एक गरीब अर्जुन दत्तात्रय केरकर उर्फ गमबली दादा यांना निवडणुकीत विजयी झाल्यास नवीन घर बांधून देणार, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन सावंत यांनी पूर्ण केले.
  मंगळवारी अर्जुन केरकर कुटुंबीयांना नवीन घराचा ताबा ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आला.
अर्जुन दत्ताराम केरकर ऊर्फ गमबली दादा हे पत्नीसह जुन्या घरात राहात होते. त्यांना काँक्रेट चे घर आपले असावे ही त्यांची इच्छा होती व तशी त्यांना आवड होती. २०२२ च्या पंचायत निवडणुकीत अमित सावंत यांनी निवडून आल्यास घर बांधून देण्याचे आश्वासन केरकर यांना दिले होते. ते पूर्ण केल्याबद्दल मला आनंद होत आहे, असे सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *