आताच शेअर करा

सिंधुदूर्ग : प्रतिनिधि

दिनांक : १५ ऑगस्ट २०२४
    मुंबई गोवा महामार्गावर बांदा डोंगरआळी येथे तीन बुरखाधारी इसमानी आपल्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की करत कार्यालयातील दस्तऐवज व आपला मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार सचिन बाळकृष्ण गवस (मुळ रा. झोळंबे, सध्या रा. बांदा) यांनी बांदा पोलिसात दिली आहे. तक्रारीनुसार बांदा पोलिसात तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या आणि घातपाताच्या उद्देशानेच ही घटना घडली असल्याचा आरोप श्री गवस यांनी केला आहे.
    गवस यांनी तक्रारीत म्हटले आहे कि, शनिवार दिनांक १० रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपण आपल्या कार्यालयात मुलग्यासोबत ऑनलाईन एज्युकेशनचे धडे बघत होतो. त्यावेळी अचानक तीन बुरखाधारी इसम आपल्या कार्यालयात घुसले. आपण विचारणा करत असतानाच त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कार्यालयाच्या बाहेर खेचून नेण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलग्याने व मी स्वतः आरडाओरडा करत याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे तसेच आपला मोबाईल हिसकावून नेला. मी आरडाओरडा केल्याने तेथून जवळच असलेले विवेक गवस व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर हे मदतीसाठी धावून आलेत. तोपर्यंत संशयितानी नंबर प्लेट नसलेल्या मोटारीतून पलायन केले.
   श्री गवस यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाल्याने त्यांनी उपचार करून घेतले तर घटनेची तात्काळ कल्पना बांदा पोलिसांना दिली. मात्र तोपर्यंत संशयित फरार झालेत. काल सायंकाळी उशिरा त्यांनी फिर्याद दाखल केली. बांदा शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने संशयित महामार्गावरून प्रसार झालेले आहेत सदर व्यक्तीस कार्यालयात घुसून मारहाणी केल्याची घटना घडली आहे मात्र महामार्गावर तसेच इन्सुली तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने संशयिताना पसार होण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे त्यांना शोधून काढण्यास पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. बांदा शहरातील अशा घटना घडणे हे निषेधार्थ आहे. ज्यावेळी संशयीतानी संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी बाजूच्या हॉटेलमध्ये बाहेर बसलो होतो ही घटना घातपाताची असल्याची जाणीव होताच आम्ही लगेच संबंधित ठिकाणी धाव घेतली परंतु संशयित पळून जाण्यास प्रयत्नशील ठरले आम्ही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण अपयश आल्याचे  प्रशांत बांदेकर म्हणाले. कोकणातील गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बांदा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या घटनेच्या माध्यमातून निदर्शनास येत आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे चालू करावे व   बांदा पोलिसांनी खचून तपास करून संशहिताचां  शोध घ्यावा. झालेल्या झटापटीत सचिन गवस जखमी झाले आहेत असेही बांदेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *