
दिनांक:०८/११/२०२६
सिंधुदुर्ग:राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरी, इस्लामपूर येथे सिंधुदुर्गचे शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे कृष्णा डेरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. एस. डी. ढोपे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.
यावेळी कृष्णा डेरीच्या संघातील कर्मचारी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीत शेतकरी व पशुपालकांच्या हितासंबंधी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
श्री अंकित प्रभू आजगांवकर यांच्या भेटीमुळे सिंधुदुर्गातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी भविष्यात सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
