
दिनांक: ६ सप्टेंबर २०२५
(गोवा) कोरगाव प्रतिनिधी: कोरगावचे पत्रकार मकबुल माळगीमनी यांनी आपल्या घरात गणपती ची मूर्ती स्थापन करून गणेश उत्सव साजरा केला.
हिंदू मुस्लिम शिख ईसाई सर्वधर्मसमभाव आहे याची समाजामध्ये साकड घालून दिली. धर्मा पेक्षाही श्रद्धा ही सर्वात मोठी आहे याची आज समाजात जाणीव करून दिली.
मुकबुल हे मूळचे कर्नाटकचे असून कर्नाटक मध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत असताना तिथे गणेश उत्सव त्याच्या घरात साजरा केला जात असे.आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्यावेळी त्यांनी गोव्यात येऊन आपली पत्रकारिता सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या मनात आपणही गणेश चतुर्थी निमित्त चतुर्थी सणात गणपती मूर्तीची स्थापन करून साजरी करावी अशी इच्छा झाली परंतु वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे भाड्याच्या घरात गणेशाची मूर्ती स्थापन न करता ती स्वतःच्या मालकी हक्काच्या घरात गणेशाची स्थापना करावी असे सांगण्यात आले. गेले अनेक वर्ष मकबुल हे भाड्याच्या घरात राहत होते. नवीन घर झाल्या नंतर गणपती चतुर्थी निमित्त गणेशाची मूर्ती स्थापन करून गणेश उत्सव साजरा केला हा गणेशोत्सव साजरा करून त्यांनी समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण केली आहे.
ते म्हणतात माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म त्या पलीकडे दुसरे काही नाही जसे आम्ही आमच्या अल्ला ला पुजतो तसे गणपतीला अल्ला समजून गणपतीची मनोभावे पूजा करतो ईश्वर अल्ला हे एकच आहे. समाजात सर्व जातीपातीच्या राजकारणात माणूस म्हणून जगता आले तर प्रत्येक धर्माचा आदर करता येईल. समाजाने आज त्या नजरेने माणसाने माणसाकडे पाहिले पाहिजे तरच समाज टिकून राहील.