आताच शेअर करा

दिनांक: ०९/०८/२०२६

बांदा: सिंधुदुर्गनगरीत ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन’  बांदा : सिंधुदुर्गनगरीत भव्य सोहळ्यात विलवडे येथील युवा भजनी कलाकार बुवा महेश मनोहर नाईक यांना त्यांच्या उल्लेखनीय,सातत्यपूर्ण आणि समाजहिताच्या कार्याबद्दल ‘महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार 2026’ मान्यवराच्या उपस्थिततीत पूरस्कार प्रदान करण्यात आला. महेश नाईक गेल्या 15 वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असून हा वारसा त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते डबलबारीच्या माध्यमातून प्रबोधन,मनोरंजन करताना संगीत वारसा जपत आहेत. युवा पिढीला संगीत कलेकडे वळवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.ते संगीत विशारद परीक्षेत उत्तीर्ण झाले असून संगीत विशारद गुरुवर्य श्रीमान राऊळ यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहेत. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन – सिंधुर्गनगरी 2026’ चे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,ज्येष्ठ संगीतकार अतुल दिवे,चौकशी अधिकारी विजय चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुषार शिवशरण,सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर,ज्येष्ठ दशावतार कलावंत दादा राणे-कोनस्कर आणि राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्सचे चिफ एडिटर तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा.डॉ.बी.एन.खरात आणि यश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा ऋतुजा राजेश परब यांनी महेश नाईक यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थितीती होती. फोटो : सिंधुदुर्गनगरीत येथे युवा भजनी कलाकार बुवा महेश नाईक यांना मान्यवराच्या उपस्थितीत मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *