
दिनांक: ८ डिसेंबर २०२५
हरमल प्रतिनिधि: गोव्यामध्ये नाताळ उत्सव म्हटला की सर्व धर्मीय मिळून गुण्या गोविंदना हा सण साजरा करत असतात. परंतु डिसेंबर महिना लागला की पर्यटकांचा ओघ गोव्याच्या दिशेने वळत असतो. या वर्षी असेच चित्र गोव्यामध्ये दिसून येत आहे . थंडीचा जोर वाढला आणि देशातील पर्यटकांची गोव्यात समुद्रा प्रमाणे भरती आलेली दिसून येत आहे. काल संध्याकाळी ही पर्यटकांची भरती हरमल बीच वर दिसून आली. विदेशातील पर्यटक आणि देशातील पर्यटक या वर्षी गोव्यात जास्तीत जास्त लोकसंख्येने दिसून येत आहेत. गोव्यातील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या तीस डिसेंबर पर्यंत ही गर्दी अजून वाढू शकते. या पार्श्वभूमीवर नाताळ उत्सवास पोलिस प्रशासन सज्ज झालेले दिसून येत आहे.
