कास रसत्याचे ७ कीलोमीटर डांबरीकरण, मोऱ्या बांधण्याचे काम सुरू आहे.सदरच्या कामाची पहाणी करण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित गेले होते त्या दरम्याने कामगारानी डाबंर मारण्यापूर्वी खडी पसरत असल्याचे पंडीत यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कास गावाचे प्रथम नागरिक म्हणून कामाचा पोच खराब असल्याने काम थांबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे काम करू नका अशी समज देऊ नये ठेकेदारांनी काम चालूच ठेवले.पंडीत यांनी सार्वजनीक बांधकाम कार्यालयात जावुन कनिष्ठ अभीयंता ईश्वर बामणे यांना कामाची कल्पना देवुन ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहे.अशाप्रकारचे रस्त्याचे काम आम्ही करायला देणार नाही अशी समज देत होते.यावेळी ईश्वर बामणे हे संतप्त झाले आणि त्यांनी पंडीत यांना अरेतुरेची भाषा वापरत तू काम बंद करूनच दाखव तूझ्यावर शासकिय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.सरपंचाना धमकी दिल्याने कास ग्रामस्थ आक्रमक झाले.आक्रमक झालेल्या ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य हे सुरू असलेल्या ठीकाणी जावुन काम बंद पाडले.ग्रामसाथानी दूरध्वनी वरून बामणे यांना संपर्क करून त्वरीत येवुन कामाची पहाणी करण्यास सांगीतले.मात्र बामणे यांनी येण्यास मुद्दाम ऊशीर केला तब्बल दोन तासानंतर बामणे हजर झाले.आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी बामणे यांना घेराव घालुन धारेवर धरले.सदरचे काम कशाप्रकारे सुरू आहे ते दाखवुन आता आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थानी केली.ज्या बामणेनी सरपंचाना धमकी दिली होती त्या बामणेची बोलतीच बंद झाली.आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी बामणे यांची चांगलीच कान ऊघडणी केली. गारामस्थानी बामणे यांनी स्वतःहा उभे राहुन करून घेण्यास खडसावले.अखेर बामणे यांनी माफी मागुन आपण स्वतःहा उभे राहुन काम करून घेणार असल्याचे मान्य केले.ठेकेदाराने मुकादमला योग्यप्रकारे काम करून घेण्यास सांगुनही मुकादमाने हेळसाड केल्याने सरपंच यांनी बामणे यांच्या निदर्शनास आणले.मात्र बामणे यांच्या उध्दटपणामुळे नाहक ग्रामस्थाना मनस्थाप भोगावा लागला.यावेळी उप सरपंच श्रेया राणे,ग्रामपंचायत सदस्य रूक्मीणी पंडीत,ग्रामस्थ देवीदास सातार्डेकर,महादेव राणे,रामदास कासकर,नारायण पंडीत,प्रणय राणे,शांताराम राणे,शशिकांत पंडीत,गुरू कासकर,सुरेश गावडे,प्रकाश वालावलकर यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ ऊपस्थीत होते.