आताच शेअर करा

ता:२१ जनेवरी २०२४

मडूरा दशक्रोशीतील कोकण रेल्वे प्रवासी संघटना दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी हनुमान मंदिर मडूरा येथे बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये कोकण रेल्वेच्या प्रलंबित असलेल्या काही विषयावर आणि नवोदित काही मागण्यावर ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या चार विषयावर चर्चा करण्यात आली त्या चर्चेअंती पहिला विषय मडूरा स्टेशन वर कोकण कन्या एक्सप्रेस ला थांबा द्यावा. मांडवी ला थांबा द्यावा. तसेच सावंतवाडीतून मुंबईच्या दिशेने निघणारी गाडी सावंतवाडी एक्सप्रेस ही सोडताना मडूरा स्टेशनवरनं सोडावी आणि मुंबई वरून येणारी गाडी हिचा प्रवास मडूरा स्टेशनवर संपवावा.

मडूरा स्टेशन वर एकच प्लॅटफॉर्म असल्याकारणाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि दोन प्लॅटफॉर्म मधील येण्या जाण्यासाठी लागणारे ओवर बीच हे ही त्याच दरम्यान बनवून घ्यावे तसेच प्लॅटफॉर्म वरील असलेले छप्पर आणि स्टेशन पर्यंत येण्या जाण्याचा रस्ता पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या बनून घ्यावा

भविष्यात मालगाड्यांसाठी डेपो बनवून मालगाड्यांच्या माध्यमातून कोकणातील असणारा आंबा, काजू तसेच शेतकरी घेत असलेल्या पिकांचा निर्यात करण्यासाठी कोकण रेल्वेने महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन मडूरा या स्टेशनला प्राधान्य देऊन निर्यात करण्यास प्रारंभ करावा तसेच या अगोदर केलेल्या कोकण रेल्वे कडे मागण्या असतीलच पण या नवीन तीन मागण्यामुळे जवळपासच्या ४० ते ४६ गावांना या पुढील मागण्यांचा फायदा होईल ह्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती

या बैठकीस ॲड.नंदन वेंगुर्लेकर संयोजक कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग,श्री संजय लाड अध्यक्ष वीज ग्राहक संघटना सावंतवाडी,श्री सुरेश गावडे,श्री विजय वालावलकर,श्री वसंत धुरी,श्री सुजित देसाई,श्री एस आर पायनाईक,श्री मांजरेकर,श्री पेदृ डिसोजा,श्री अर्जुन देऊलकर,श्री जगन्नाथ पंडित,श्री दिनेश नाईक,श्री बाळू मातोंडकर,श्री प्रवीण परब,श्री पंढरी सातार्डेकर,श्री गाड बुवा श्री यशवंत माधव आणि इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *