आताच शेअर करा

दिनांक २० जानेवारी २०२४

अयोध्या येथे संपन्न होणाऱ्या राम लल्ला प्राण प्रतिष्ठा व राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने आपल्या श्री. देवी माऊली मंदिरामध्ये आपण खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

*२२ जानेवारी २०२४ सकाळी ठीक ८:०० वाजता* -श्री देवी माऊली पंचायतनावर अभिषेक व देवतांची पूजा.

*सकाळी ठीक १०:०० वाजता* – प्रभु श्रीरामांच्या फोटोचे पुजन करून रामयज्ञ विधीस प्रारंभ.

*दुपारी ठीक १२:०० वाजता* – श्रीराम नाम जप मंत्र उच्चारण.

दुपारी १२:२३ ते १२:२९ या शुभमुहूर्तावर प्रभु श्री रामांच्या फोटोवर अक्षता वाहणे. तद्नंतर आरती, सांगणं करणे व तिर्थप्रसाद.

*संध्याकाळी ठिक ७:०० वाजता* – मंदिरात दिपोत्सव व पणत्या लावणे. महिलांना हळदीकुंकू. आणि तद्नंतर भजन करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी आपणा सर्व राम भक्तांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आव्हान श्री देवी माऊली देवस्थान उपसमिती सातोसे अध्यक्ष श्री वसंत धुरी यांनी केले

All reactions:

1010

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *