
पेडणे प्रतिनिधि
दिनांक: २७ जानेवारी २०२५
मोरर्जी जेष्ठ नागरिक मंचाची बैठक देश प्रभू कॉम्प्लेक्स मोरजी या ठिकाणी मंचाच्या कार्यालयात मावळते अध्यक्ष जगन्नाथ वाडजी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन नवीन तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून शिवनाथ शेटगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इतर समिती
उपाध्यक्ष :धनंजय शेटगावकर
सचिव: प्रकाश काळु शेटगावकर
उपसचिव :उमाकांत नानू शेटगावकर
खजिनदार: प्रभाकर विठ्ठल गावकर
उपखजिनदार: रवी रामचंद्र शेट्ये. तर सदस्य म्हणून विद्यादर मोरजे, महादेव कोले, महेश खोत, रोहिदास दाभोलकर, गंगाराम शेटगावकर, गणेश शेटगावकर व लाडू रेडकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.