
सातार्डा प्रतिनिधि : संदिप कवठणकर
दिनांक:२ जानेवारी २०२५
मडूरा सातार्डा रस्त्यावरील जय पारिपत्ते यांच्या घराजवळील असलेले पुलाचे उद्घाटन निवृत्त शिक्षक जगन्नाथ पंडित यांच्या हस्ते कुदळ घेऊन पूलाचे भूमिपूजन ३१ डिसेंबर २०२४ करण्यात आले आहे. हा रस्ता मडूरा दशक्रोशीतील महत्त्वाचा रस्ता असून ह्या रस्त्याचा संपर्क गोव्याशी रहदारीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो. तरी सदर पूल हे पावसाच्या दिवसात पाण्याखाली येत होते. त्यामुळे गोव्यात येण्या जाणाऱ्या पावसाच्या दिवसात टू व्हीलर आणि बस व वाहनांना जाण्यासाठी मार्ग बंद होत असे त्यामुळे गोव्यात जाणाऱ्या नोकरदार वर्गाला खूप त्रास होत असे. किंबहुना नोकऱ्यांना दांडी मारावी लागत असेल त्यामुळे संघर्ष समितीने त्याचा पाठपुरावा गेल्या काही वर्षापूर्वी करून बांधकाम विभागाकडे सदर पूलाची मागणी केली होती. बांधकाम विभागाने या दशक्रोशीतील लोकांची होणारी गरसोय ओळखून या पुलासाठी १कोटी ३५ लाख रुपये आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर करण्यात आले.


प्रमुख उपस्थिती सातार्डा सरपंच सन्माननीय बाळू प्रभू,उपसरपंच सौ. पारीपत्ते,माजी सरपंच उदय पारीपत्ये,सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ, जया पारिपत्ये,ज्ञानदीप राऊळ,संतोष गोवेकर, सातोसे माजी सरपंच आबा उर्फ वसंत धुरी, कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा सरपंच उदय चिंदरकर,उपसरपंच बाळु गावडे,माजी सरपंच आनंद परब,माजी उपसरपंच विजय वालावलकर,दिलीप परब,श्रीकृष्ण भोगले,रोणापाळ माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे माजी सरपंच समीर गावडे,माजी उपसरपंच गुरुदास गवंडे,रिक्षा व्यावसायिक पेदृ डिसोजा,संभाजी परब आणि सागर गोठोस्कर,रमेश पंडित,शिवराम पंडित,महादेव राणे,बाबू पंडित,संदेश राऊळ,ठेकेदार मेहर पडते आणि मडुरा दशक्रोशितील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.विशेष सहकार्याबद्दल सार्वजनिक बांधकाम उप अभियता सगरे साहेब,कार्यकारी अभियंता किणी साहेब, दिपकभाई केसरकर,आपा राऊळ, जया पारीपत्ये,सन्माननीय गाडगीळ भटजी भगवान रेडकर, रोहन रेडकर, रामा पेळपकर, आना रेडकर डकर, राणे, संतोष गोवेकर, उदय परिपत्ते, सातार्डा फार्मसी ज्ञानदीप राऊळ,, जया परिपत्ते, आपा परिपत्ते संतोष परिपत्ते मिलिंद जाधव यशवंत पंडित महेश परब रमा पायनाईक.आणि इतर सर्वांचे आभार पंडित सर यांनी मानले.