सावंतवाडी प्रतिनिधि
दिनांक: ३० डिसेंबर २०२४
सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मुख्य तटभिंतीची उंची वाढवण्याचे कामकाज मा. जिल्हा अधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर झाले असल्याने सदय स्थितीस सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडून तटभिंतीचे उंची वाढविण्याचे कामकाज सुरु आहे. सदर बांधकामाकरिता दगडी चिरासह आरसीसी बांधकाम आहे. बांधकाम करताना कारागृहाच्या पश्चिमेकडील (कारागृहाची मागील बाजू) व दक्षिणेकडील (कारागृहाची उजवी कडील बाजू) दैनंदिन वाहतुकीस असणाऱ्या रसत्यावर दगडी चिरे व रेती, वाळू इ. टाकले जाणार असल्याने नागरीकांना वाहतूक करणे शक्य होणार नाही. तसेच वाहतूक बंद न ठेवल्यास नागरिकांच्या जिवीतास हानी पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता कारागृहाच्या पश्चिमेकडील बाजूचे व दक्षिणेकडील बाजूचे बांधकाम करताना तटभिंतीस लागून असलेले दोन्हीही रस्ते वाहतूकीकरीता दिनांक ३०/१२/२०२४ पासून बंद ठेवणे आवश्यक आहे. तरी आपल्या कार्यालयाकडून सावंतवाडीतील नागरीकांना कारागृहाच्या तटभिंतीचे पश्चिमेकडील बाजूचे व दक्षिणेकडील बाजूचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करणे बाबत आवाहन करण्यात यावे, असे विनंती पत्रक महाराष्ट्र राज्य कारागृह व सुधारणा सेवा जिल्हा कारागृह (जिल्हा सिंधुदुर्ग) गृह विभागअधीक्षक सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग-२ जिल्हाः-सिंधुदुर्ग यांच्याकडून मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपंचायत यांना देण्यात आले आहे. तसेच नगरपंचायातीने दिलेला पर्ययी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन नागरीकांना कऱण्यात आले आहे.


