
बांदा प्रतिनिधि:अक्षय मयेकर
दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या गतीने मतदान झाले. बांदा शहरातील सटमटवाडीतील काही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. मात्र मतदारांनी बहिष्कार धुडकावत उस्फुर्तपणे मतदान केले.
सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागात ३० ते ३५ टक्के मतदानाची सरासरी राहिली. बांदा शहरात सकाळच्या सत्रात नेहमीच मतदारांचा उस्फुर्त मतदानात सहभाग असतो. सकाळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. बांदा केंद्रशाळेत निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची उभारणी केली. याठिकाणी दिव्यांग, वयोवृद्ध तसेच नवमतदारांचे प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बांदा येथे श्री तुकाराम मोरजकर यांनी व्हील चेअरवरून येत आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्या वेळी बांदा केंद्र शाळेत निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचें स्वागत केले.

