
सिंधुदूर्ग :प्रतिनिधि
दिनांक:२५ ऑगस्ट २०२४
निगुडे परिसरातील क्वारी व केशर बाबतीत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते. त्यावेळी श्री निगुडकर यांना संबधित प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आणि महसूल प्रशासनाने आपणच दिलेला आश्वासनावर ठाम न राहता दिलेल्या आश्वासना काळिंबा फासल्याने सोमवारी २६ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसह पुन्हा ग्रामपंचायत आवारामध्ये उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी दिला आहे. निगुडे गावाच्या सिमेलगत असलेल्या कॉरी व क्रेशरमुळे गावातली १५६ घरांना तडे गेल्याने नुकसान झाले आहे. गावातून होणाऱ्या भरधाव ओव्हरलोड खनिज वाहतुकीमुळे अनेक समस्या उद्भवत आहे. तसेच रात्री अपरात्री होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे नुकसानासह जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे घरांची नुकसान भरपाई, गावातील ओव्हरलोड वाहतूक आणि अवेळी होणारे ब्लास्टिंग बंद होण्यासाठी गावात बैठक घेऊन सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी निगुडे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण छेडले होते. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ४ दिवसात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गावात पाचारण करून प्रत्यक्ष पाहणी करून, ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न व समस्या सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र २३ऑगस्ट पर्यंत या मागणीची पूर्तता न झाल्याने सोमवारी २६ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह पुन्हा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा निगूडे सरपंच निगुडकर यांनी दिला होता. मात्र गेल्या दहा दिवसात महसूल प्रशासनाने कोणतेही कारवाई केली नाही. म्हणुन दिलेल्या आश्वासनाला न जागल्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच निगुडकर यांनी पुन्हा सोमवारी २६ ऑगस्ट पासून उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
