आताच शेअर करा

(गोवा) :पेडणे प्रतिनिधि

दिनांक:२४ ऑगस्ट २०२४
पूर्वी रितेश नाईक  या जलतरण परिने भुवनेश्वर ओडीसा येथे सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्या राज्याला राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या स्पर्धेतून सुवर्णपदकासह एकूण चार पदके मिळवून देऊन या जलपरीने गोवा राज्याचे नाव उज्वल केले आहे. पूर्वी नाईकचे हे  यश अभिनंदनीय  आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात त्यांनी यापुढेही देशाचे  प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही गोव्याचे आणि भारत देशाचा लौकिक वाढवावा आणि गोव्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्वल करावे असे आवाहन नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी केले.
हरवळे येथील पूर्वी रितेश नाईक या  इयत्ता सहावीत शिकणाऱ्या जलतरण परीने राष्ट्रीय स्तरावर गोवा राज्याचे नाव उज्वल केले. भुवनेश्वर ओडीसा येथे संपन्न झालेल्या ४० व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर व ५०  व्या ज्युनिअर जलतरण अजिंक्य स्पर्धेत गोव्याच्या पूर्वी रितेश नाईक या मुलीने  जबरदस्त परफॉर्मन्स देत गोवा  राज्याला सुवर्णपदकासह एकूण चार पदके मिळवून दिल्याबद्दल फुले- शाहू- आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे व नवचेतना युवक संघ पेडणे या संस्थेतर्फे पूर्वी नाईकचा गौरव कार्यक्रमात नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालेकर बोलत होते .
   यावेळी धारगळचे पंच सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते भूषण उर्फ प्रदीप नाईक, अन्न  पुरवठा नागरिक कार्यालयाचे अधिकारी योगेश तळवणेकर, फुले- शाहू -आंबेडकर प्रतिष्ठान पेडण्याचे अध्यक्ष महादेव गवंडी, कृष्णा जोशी, माजी पंचायत सदस्य समीर बागी, कुष्टा पेडणेकर , पूर्वीचे वडील रितेश नाईक ,आई नम्रता नाईक आदी उपस्थित होते.
  [] भुवनेश्वर येथे हल्लीच संपन्न झालेल्या  ४० व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर व ५० व्या ज्युनियर जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत पूर्वी नाईकने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना  गोव्याला एक सुवर्णपदक दोन रौप्य पदक तर एक कास्य पदक मिळवन दिले . या  स्पर्धेत पूर्वी नाईकची आता चार राष्ट्रीय पदके झाली आहेत.
  पूर्वीने  सुवर्णपदक  ५० मीटर फ्रिस्टाईलमध्ये मिळवून दिले. तिने सुवर्णाला गवसणी घालताना ३०:७० अशी वेळ दिली.
[] यावेळी बोलताना भूषण नाईक म्हणाले की पूर्वी रितेश नाईक या सहावीत शिकणाऱ्या मुलीने गोवा राज्यासाठी राष्ट्रीय स्तरावर चार पदके मिळवून दिली आहे. हे यश खूप कौतुकास्पद आहे .एवढ्या लहान वयात त्यांनी मिळवलेले यश सर्व इतर खेळाडूंना आणि जलतरण स्पर्धेत जे खेळाडू सहभागी होतात त्यांना प्रेरणादायी आहे. या यशामुळे गोवा राज्याचे जलतरण स्पर्धेत नाव निश्चितच उंचावलेला आहे. पूर्वीने यापुढेही असेच उज्वल यश संपादन करून गोवा राज्याचे आणि आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले.
[] यावेळी बोलताना योगेश तळवणेकर म्हणाले की क्रीडा क्षेत्रात आता मेहनत आणि परिश्रम घेतल्यानंतर यश संपादन करता येते आज पूर्वी यांनी हे सिद्ध करून दाखवलेले आहे यासाठी त्यांचे आई-वडील त्यांचे प्रशिक्षक यांनी खूप मेहनत घेतली असेल त्यामुळेच आज पूर्वी हे यश राष्ट्रीय स्तरावर संपादन करू शकली.

एखाद्या खेळाडूला आणि कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कौतुकाची थाप गरजेची असते आणि आज ही कौतुकाची थाप फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान आणि नवचेतना युवक संघ पेडणे यांच्यातर्फे पूर्वीला देण्यात आली आहे यातून त्याला निश्चितच आणखीही पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. भविष्यात पूर्वी यांनी देशाचे नाव  आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन सुवर्णपदके मिळवून उंच करावेअशा त्यांना शुभेच्छा दिली.
  पूर्वी नाईक हिने राष्ट्रीय स्तरावर या संपादन केल्याबद्दल फुले -शाहू -आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे आणि नवचेतना युवक संघ पेडणे यांच्या वतीने स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
स्वागत आणि प्रस्ताविक महादेव गवंडी यांनी केले. सूत्रसंचालन समीर बागी यांनी केले तर आभार  नम्रता नाईक हिने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *