
सिंधुदूर्ग: प्रतिनिधि
दिनांक:२१ ऑगस्ट २०२४
इन्सुली उपसरपंच पदी भाजपच्या सदस्या सौ. वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड झाली इन्सुली ग्रामपंचायत सभागृहात उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यासाठी केवळ वर्षा सावंत यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असे ग्राम विस्तार अधिकारी ज्ञानदेव चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर कास सरपंच प्रवीण पंडित, निवृत्ती पोलीस निरीक्षक अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर, मा. पं. सदस्य सभापती मानसी धुरी, ग्रामपंचायत सदस्य नमिता नाईक, राधिका सावंत, स्वागत नाटेकर, दत्ता खडपकर, माजी सरपंच अश्विनी परब, नाना पेडणेकर, पूजा पेडणेकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, काका चराटकर, ज्ञानेश्वर राणे आधी उपस्थित होते
उपसरपंच कृष्णा सावंत यांनी पक्ष धोरणानुसार राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदासाठी आज बुधवारी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती. सकाळी नाम निर्देशांक दाखल करताना वर्षा सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अन्य उमेदवार अर्ज दाखल न झाल्याकारणामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष अजय कोठावळे, सचिन दळवी, राजन गावडे, नितीन राऊळ, महेंद्र सावंत, अजय सावंत महेंद्र पालव, संजय पालव, उमेश पेडणेकर, महेश धुरी आदी उपस्थित होते.
