गोवा: हर्मल प्रतिनिधि
दिनांक:१ ऑगस्ट २०२४
पेडणे तालुक्यातील केरी तेरेखोल गावातील शैक्षणिक संस्थेच्या नावातच विकास,कल्याण व शिक्षण हे मूलभूत घटक असल्याने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावची शाळा शिक्षण क्षेत्रात प्रगतीशील आहे. संस्थेला युवा मनाचे मार्गदर्शक व्यवस्थापन असल्याने त्यास उज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन डिजिटल ‘गांवकरी’ चॅनलचे संपादक किशोर नाईकगावकर यांनी केले.
केरी तेरेखोल परिसर विकास,कल्याण व शैक्षणिक संस्थेच्या ५२ व्या स्थापना दीन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष ब्रजेश केरकर,उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर,डॉ अनंत नाईक,खजिनदार मिलिंद तळकर,सदस्य दत्ताराम नाईक,राजन सावळ,आनंद शिरगांवकर,शरद तळकर, बाळा फरास,व्यवस्थापक शैलेंद्र कुबल,बाबुसो तळकर,सूरज तळकर, पालक शिक्षक संघाचे अमृत पेडणेकर व प्रज्योती वस्त व मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते.
सद्या काळानुरूप अनेक आव्हाने असून,सर्वांनी एकजुटीने ती मोडीत काढली पाहिजे.गोवा मुक्तीनंतर ह्या संस्थेची स्थापना झाली.माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची शिक्षणाबद्दल दूरदृष्टी होती. सद्या शाळेचा परीक्षा निकाल व प्रगती खूपच समाधानकारक आहे.सध्याच्या युवा पिढीने,व्यवस्थापनाला साथ दिल्यास ही संस्था निश्चितच गोव्यात नावाजती होईल,असा विश्वास असल्याचे पत्रकार नाईक गावकर यांनी पुढे व्यक्त केले.
अध्यक्ष व्रजेश केरकर आपल्या स्वागतपर भाषणात म्हणले कि, शिक्षण संस्था ही कोणाची खाजगी मालकी नसून,गावातील प्रत्येक लोकांची ही संस्था आहे.गावातील संस्थापक सदस्यांनी इमारतीसाठी कष्ट घेतले,विना मोबदला कार्य केले,त्यांच्या कार्याला सलाम आहे तसेच त्यांच्या शिकवणीनुसार विद्यमान व्यवस्थापन या संस्थेची धुरा सांभाळत आहे. अनेक जण संस्थेला मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्यात केरी गावचे संजीव तळकर यांनी दोन लाख रुपये संस्थेला दान दिले आहे. काम करताना आमच्याकडुन काही चुकत असल्यास लोकांनी तर निदर्शनास आणून द्यावे व एकजुटीने संस्थेच्या प्रगतीसाठी झटावे.
केरी शिक्षण संस्था संचलित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र केरीत चालते.यंदापासून संस्थेला विशारद पूर्ण पर्यंत परीक्षा घेण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे,गोव्यात अशी एकमेव संस्था असल्याचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यानी व्यक्त केले.गेल्यावर्षी विद्यालयाने तीन संगीत नाटकाची निर्मिती केली तसेच गोव्यात व महाराष्ट्रात नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले,त्यात विद्यार्थ्यांचा व व्यवस्थापनाचा योग्य वाटा असल्याचे मुख्यद्यापक मांद्रेकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी पत्रकार संपादक किशोर नाईक गावकर यांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या तसबिरी पुष्पहार अर्पण केला.आठवीच्या विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले,त्यांना साथसंगत संगीत शिक्षक राजेश पुर्खे व स्वप्नील मोरजे, रोशनी नाईक गांवकर यांनी केले.यावेळी संस्थापक सदस्य व २०२४ मधील बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सत्कारमूर्ती डॉ अनंत नाईक व संगीत शिक्षक दिलीप रेडकर तर विद्यार्थिनी चैताली रांगणेकर यानी मनोगत व्यक्त केले.यावेळी विध्यार्थी मंडळास शपथ देण्यात आली.पाहुण्याची ओळख सर्वेश कोरगावकर,सत्करमुर्तीची ओळख शिक्षक गुरुप्रसाद तांडेल, विध्यार्थी गौरव सोहळ्याचे निवेदन नीलम महालदार तर सूत्रसंचालन सूरज आजगावकर व शिक्षिका वैशाली न्हानजी यांनी आभार मानले.शिक्षिका मिताली हरमलकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झली.