गोवा: हर्मल प्रतिनिधि
दिनांक: १ ऑगस्ट २०२४
केरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक सदस्य, प्रतिष्ठित नागरिकांचा जाहीर सत्कार
केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण व शिक्षण संस्थेच्या ५२व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून केरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक, निवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
त्यानिमित्ताने संस्थापक अध्यक्ष डॉ.अनंत नाईक, संस्थापक सदस्य रत्नाकर तळकर,
रघुनाथ केरकर, चंद्रकांत माणगांवकर, रमाकांत तळकर, विष्णू मराठे, दीनानाथ काळोजी, सुरेश सावंत, लाडू केरकर, शशिकांत कुबल, प्रतिष्ठित नागरिकांपैकी यशवंत फरास, शिवांनंद तळकर, न्यू इंग्लिश हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक ग्रेगरी लोबो, निवृत्त शिक्षक नारायण गडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ नाईक यांनी सत्कार्मुर्तीच्यावतीने सत्कारास उत्तर देताना सांगितले कि, केरीतील शिक्षण संस्थेला मोठा इतिहास आहे. केरीतील लोक शिक्षणाकडे वळले आणि देश विदेशात आपले नांवलौकिक प्राप्त करीत आहेत त्याचा पाया याच शिक्षण संस्थेने घातला आहे याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी. त्यांनी शिक्षणाच्या पवित्र कार्यात पुढकार घेऊन केरीत नव्याने शैक्षणिक क्रांती घडवावावी.
कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्रजेश केरकर, विठ्ठल गडेकर, शैलेश कुबल, मिलिंद तळकर, दत्ताराम नाईक, बाळा फरास, आनंद शिरगांवकर, शरद तळकर, बाबुसो तळकर, सुरज तळकर, राजन सावळ,अमृत पेडणेकर, प्रज्योती वस्त, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गांवकारी या डिजिटल बुलेटिनचे संपादक कुशोर नाईक गांवकर यांच्या हस्ते सर्वांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद तांडेल यांनी केले.