आताच शेअर करा

दिनांक: ०२/०२/२०२६

सावंतवाडी: भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा उद्या मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यात दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहीत असून उमेदवारांच्या विजयाचा विश्वास वाढला आहे.

दि. ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपा युवानेते विशालजी परब यांचा हा महायुती उमेदवार प्रचारदौरा होत आहे. दोडामार्ग तालुक्याच्या तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीमध्ये लढत होत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेशजी राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या निवडणुकीत यापूर्वीच पंचवीस उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचे पारडे विजयाकडे निर्वीवादपणे झुकलेले दिसून येत आहे.

महायुतीच्या प्रचारार्थ उद्या विशालजी परब यांचा दोडामार्ग तालुक्याचा दौरा राजकीय उत्सुकतेचा विषय होत आहे. विशालजी परब यांचा ग्रामीण भागात असलेला संवेदनशील जनसंपर्क, युवा वर्गात असणारी मोठी क्रेझ ही या निवडणुकीतदेखील जमेचा भाग ठरणार आहे. महायुतीचे दोडामार्ग तालुक्यातील नऊही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास श्री विशालजी परब यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed