तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गुरूवारी १ ऑगस्ट रोजी अधिवेशन सुरू असताना पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या उपस्थीतीत निवेदन सादर करणार आहेत असा कृती समितीने निर्णय जाहीर केला आहे. गेली आठ वर्षे हॉस्पिटल तयार होऊन स्थानिक नागरिकांना त्याचा आज पर्यंत कोणताही फायदा झाला नाही. इमारत उभी करून फक्त शासनाचा पैसा खर्ची घालण्यात आला. संबंधित हॉस्पिटल बंद असल्या कारणांमुळे जनतेचे खुप हाल होत आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना जवळच्या हॉस्पिटल कडे धाव घ्यावी लागत आहे. अपघात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांनी कोठे जावे ? हा प्रश्न उभा आहे. जवळ हॉस्पिटल नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता दर्शवली जात आहे. तूये हॉस्पिटल हे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना बांधण्यात आले आहे.पण गेले आठ वर्षे ही इमारत उभी करूनही लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही म्हणून पेडणे तालुक्यांतील दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत हॉस्पिटलच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हे निवेदन सादर करणार आहेत.