गोवा : पेडणे प्रतिनिधि
दिनांक : २८ जुलै २०२४
पेडणे येथील श्री मूळपुरुष, रवळनाथ देवस्थानचा संप्रोक्षण, कलशारोहन व तुळशी वृंदावन विवाह विधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कुंभार समाजाच्या बांधवांचे हे मंदिर असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.कार्यक्रमास सकाळी ८ :०० वाजल्या पासून सुरवात झाली होती.तो रात्रौ ९ :०० वाजे पर्यंत कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमास अलोट गर्दी निर्माण झाली होती. दिवसभर पुरोहितांचे मंत्र उच्चारण चालू होते. त्यानंतर वाजत गाजत कलशारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच महाआरती महाप्रसादचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. संध्याकाळी ओमकार भजन मंडळ मांद्रे यांचे सुस्वर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्याचबरोबर महिलांच्या फुगडीचाही कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास पेडण्याचे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर व उद्योजक अमित शेटगावकर व पेडण्याचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा शोभा वाढवीली. तसेच काही दानशूर व्यक्तींचे सत्कार व आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.