लोकमान्य टिळक जयंती निमित्त स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती
गोवा : पेडणे प्रतिनिधि
दिनांक: २४ जुलै २०२४
पेडणे येथे श्री भगवती हायस्कूल पेडणे आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त दिनांक २३ जुलै २०२४ रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या वक्तृत्व स्पर्धेचे विषय ५ ते ७ वी या लहान गटासाठी १) समाज सुधारक – बाबा आमटे
२) भक्तीचा मेळा-पंढरीची वारी
मोठा गट ८ ते १० वी
१) धबधब्याची भुरळ – वाढते अपघात
२) रीलचे वाढते वेड
तसेच निबंध स्पर्धा लेखन ५ ते ७ वी साठी
१) माझा आवडता खेळाडू
८ ते १० वी साठी
१) भारतीय शास्त्रज्ञांची यशोगाथा
असे विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धेमध्ये तालुक्यांतील सुमारे १०० शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणुन सिंधुदूर्ग जिल्ह्याचे नामांकित पत्रकार कोकण व्हिजन न्यूज मीडिया चॅनलचे संपादक श्री. यशवंत कृष्णा माधव व गोव्याचे राज्य शिक्षक एवर्डी श्री. दिलीप तुकोजी म्हामल हे उपस्थीत होते. निवेदन करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळी सर म्हणाले की गेली पन्नास वर्षांची परंपरा आज आम्ही टिकून ठेवत स्पर्धा भरवली आहे. हया स्पर्धेतून अनिल सामंत सारखे बरेचसे वक्ते तयार होऊन आज गव्यातील लोकांना आपल्या भाषणाच्या माध्यमातून संभोदण्याचे काम करत आहेत. तसेच प्रमुख पाहूणे दिलीप म्हामल म्हणाले की मुलांनी भाषण उत्कृष्ट केल. व्यासपीठावर भाषण करत असताना साहित्याचे रस आले पाहिजे. त्याच्यावर तो निकष केला जातो.काही मुलांनी नैसर्गिकरीत्या भाषणं केलें होते त्यात यमक, लय, चढ, उतार कृत्रिमरित्या न जाणवता व्यवस्थित भाषण सादर केले. तसेच प्रमुख पाहूणे श्री. यशवंत माधव म्हणाले की स्पर्धे मध्ये भाषण करत असताना तोलामोलाचे भाषण केले पाहिजे. पाठांतर चोख पाहिजे.व्यवस्थितरीत्या शब्दांचा वापर करून शब्द फेक करता आली पाहिजे. चेहऱ्यावरती हावभाव दिसले पाहिजे. बोलत असताना हाताचा वापर झाला पाहिजे. प्रेक्षकांच्या नजरेला नजर देऊन बोलता आले पाहिजे. सभागृहातील श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेता आले तरच तो खरा वक्ता होऊ शकतो. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना स्मृति चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी शिक्षक वर्ग, स्पर्धक, त्याचे पालक आणि विद्यार्थी मित्र उपस्थीत होते.