आताच शेअर करा

दिनांक: २६/०९/२०२६

सावंतवाडी: पावसाने मागील  काही महिन्यात महिना दडी मारल्याने आलो निनो च्या प्रभावामुळे खरीब व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळ सदृश असल्याने पिकावर कणसे दिसून येत नाही. ही बाब पालकमंत्र्यांच्या लक्षात येताच पालकमंत्री थेट उदया दिनांक २७/०९/२०२६रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. सकाळी १०:३० वाजता मळगाव येथे शेतकरी भास्कर राम गावकर यांच्या शेतीला भेट देणार आहेत. नंतर ११ वाजता होडावडा येथील शेतकरी संदेश मधुसूदन पावणोजी यांच्या शेती बांधावर दुपारी  १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरस दुष्काळ परिस्थिती आढावा बैठक. दुपारी २:३० वाजता स्थळ बेळणे खुर्द: कणकवली प्रकाश गणपत चाळके तर  ३:१५ मिनिटानी नाधवडे तालुका वैभववाडी शेतकरी लक्ष्मण विठोबा हिवाळकर यांच्या शेतीला भेट. अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देणार आहेत. याची सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *