आताच शेअर करा

दिनांक: २६/०९/२०२६

वेंगुर्ला: सध्या स्थितीत पावसाने दडी मारल्यामुळे व आलो निनो च्या प्रभावामुळे भात शेतीवर व इतर खरीप हंगामाच्या पिकावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे या अनुषंगाने महत्त्वाची बाब म्हणजे दुष्काळ सदृश्य असल्यामुळे व हायब्रीड बियाणे ही पाऊस नसल्यामुळे त्यावर भाताची कणसे दिसून येत नाही व आता हा परतीचा पाऊस असल्यामुळे या पावसाचा त्या पिकांवर कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे अपेक्षा शेतकरी दुष्काळ च्या संकटात त्यात महत्त्वाची बाब म्हणजे या खरीप हंगामाची व रब्बी हंगामाची इपिक पाहणी आवश्यक करून घ्यावे जर कोणत्या अडचणी असल्यास त्यावर मात करून शासनाने शेतकरी स्तरावर इपिक करण्यासाठी अट शिथिल केलेली आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहाय्यकाचा आधार किंवा आपल्या स्तरावर शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी न पेक्षा जर एपिक पाहणी नसेल तर शेतकरी नुकसान भरपाई अथवा प्रत्येक योजनेपासून वंचित राहणार आहे याची कृपया शेतकऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन एपिक पाहणी करावी असे आव्हान छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस सदस्य शामसुंदर राय यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले  आहे. त्यामुळे जास्तीत जास्त किती होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटवर जाऊन तात्काळ मध्ये ईपीक पाहणी करावी. आतापर्यंत एकंदरीत प्लॉट २६००८५०असून त्यातील ९२,८१६ एवढी झाली आहे ही टक्केवारी अतिशय धीम्यागतीने चालत असून 0.७९%एवढी आहे. त्यामुळे  पिक पाहणी न झाल्यास शेतकरी ओल्या दुष्काळापसुन शेतकरी वंचित राहू शकतो. त्यामुळे लवकर पीक पाहणी करावी असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर रॉय यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *