आताच शेअर करा

दिनांक: ०२/०४/२०२६

सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. ०२ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंतरा बापू मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे.
अंतरा हिच्या या कर्तृत्वाचा गौरव म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मेहनत, चिकाटी आणि शिस्तबद्ध सरावामुळेच हे यश मिळाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
या सत्कार समारंभाला उपसरपंच रामचंद्र गावडे, अंतरा हिचे वडील बापू मठकर, आई अनुष्का मठकर, तसेच प्रवीण बर्वे, बाबा पालव, तुषार पालव, विश्राम पोळजी, भरत कांबळी, लवू कांबळी, अनिल मठकर, सुरेंद्र मठकर, अजित पोळजी, संदेश कांबळी, रेश्मा कांबळी, मिलिंद कांबळी, कांती मठकर आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते. सर्वांनी अंतरा हिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *