आताच शेअर करा

दिनांक:१७/११/२०२६

बांदा:सामाजिक कार्यकर्ते श्री. साईप्रसाद कल्याणकर यांनी सीमा तपासणी नाका, इन्सुली येथे भेट देऊन सुरू असलेल्या वाहन तपासणी मोहिमेची पाहणी केली.

यावेळी मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या टिप्परमधील मालावर ताडपत्री नसल्यामुळे रस्त्यावर माल सांडून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा सर्व वाहनांमधील मालावर ताडपत्री टाकूनच वाहतूक करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली.

सीमा तपासणी नाका इन्सुली येथे या महिन्यात आजपर्यंत **ताडपत्री न टाकता वाहतूक करणाऱ्या 36 वाहनांवर कारवाई** करण्यात आली आहे. या प्रभावी कार्यवाहीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी सर्व वाहनमालक व चालकांना आवाहन केले की, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करून प्रत्येक टिप्परमधील माल व्यवस्थित ताडपत्रीने झाकूनच वाहतूक करावी.

या तपासणी मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक श्री. वसंत कलंबरकर साहेब, मोटार वाहन निरीक्षक श्री. माणिक चोरमले आणि लेखापाल श्री. राजू ओसरमल यांच्या सहकार्याने वाहन तपासणी व कारवाईचे काम प्रभावीपणे सुरू आहे.

**सर्व वाहनमालक व चालकांना आवाहन!**

आपल्या निष्काळजीपणामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ देऊ नका. वाहनातून मालाची वाहतूक करताना ताडपत्रीचा वापर करा, वाहतुकीचे नियम पाळा आणि संभाव्य अपघात स्वतःबरोबर इतरांचे नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करा.

कारण…

**”सुरक्षित वाहतूक ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाचे सामाजिक कर्तव्य आहे!”**

🚦 *रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा!* 🚦

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed